जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी केलेली हनुमान स्तुती
◾जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी केलेली हनुमान स्तुती ◾ हनुमान हे रामायणातील एक प्रमुख नाव असून ते रामाचे महान भक्त मानले जातात. त्यांच्या जन्मबाबत अनेक मतांतरे आहेत. महाराष्ट्रात त्यांचा जन्म चैत्र पौर्णिमेला झाल्याचे मानले जाते. त्या दिवशी हनुमान जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यांचा जन्म अंजनी नावाच्या वानरीच्या पोटी अंजनेरी जिल्हा नाशिक येथे झाल्याचे मानतात. त्यांच्या वडिलांचे नाव केसरी होते. हनुमान खूप ताकदवान महाबली होते. त्यांना भूक लागली, फळ समजून सूर्याला खायला निघाले. इंद्राने वज्र फेकून मारले ते हनुवटीला लागले. त्यावरून त्यांचे नाव हनुमान पडले. राम वनवासात असताना त्यांची व हनुमंताची भेट झाली. रावणाने पळवून नेलेल्या सीतामातेचा शोध त्यांनी लावला, रावणची लंका जाळली. लक्ष्मणाला शक्ती लागल्यावर द्रोणगिरी पर्वतच उचलून आणला. सात चिरंजीवांपैकी एक चिरंजीव म्हणून हनुमंतरायाचा उल्लेख केला जातो. त्यांना मारुती, हनुमान, पवनसुत, अंजनेय, बजरंगबली, वायुपुत्र,केसरीनंदन असे विविध नाव आहेत. जगद्गुरु संत तुकाराम महार...