Posts

Showing posts with the label neet

फक्त करिअर नाही, माणूस घडवा...मुलांना जगुद्या......!!

Image
"फक्त करिअर नाही, माणूस घडवा...मुलांना जगुद्या......!!" ◆श्रीकृष्ण उबाळे, बीड ◆मो.9405344642 आजच्या शिक्षणाच्या स्पर्धेत आपण एक महत्त्वाचा मुद्दा विसरतोय — आपलं मूल माणूस आहे, मशीन नाही! आज IIT, NEET यांसारख्या स्पर्धा परीक्षांनी कित्येक मुलांचे भवितव्य सरळ न करताच, वाकडं केलं आहे. परीक्षा फक्त ज्ञानाची कसोटी नसून, ती अनेकदा मुलांच्या मानसिक आरोग्याचीही परीक्षा ठरते. पालक, शिक्षक आणि समाज यांचं एकच स्वप्न — "माझं मूल इंजिनिअर किंवा डॉक्टर व्हावं." पण का? मुलांची खरी क्षमता, त्यांची आवड, त्यांचं वेगळेपण का स्वीकारत नाही आपण? फक्त दोनच क्षेत्रं भवितव्य घडवतात का? साधना भोसले. डॉक्टर होण्यासाठी धडपडत होती. पण तिला हे क्षेत्र झेपलं नाही. तिच्यावर लादलेलं स्वप्न तिच्या वडिलांनी लाकडाच्या दंड्याने मोडून टाकलं — तिला मारूनच टाकलं. का? कारण तिला 'डॉक्टर' होणं जमलं नाही. पण ती जर डॉक्टर झाली नसती, तरी ती 'काहीतरी' झाली असती — एक चांगली शिक्षक, लेखिका, कलाकार, शास्त्रज्ञ किंवा समाजसेविका किंवा चांगली गृहिणी झाली असतीच ना...! तिच्या अस्तित्वालाच आपण...