शेतकऱ्याच्या मुलाची केंद्र सरकारच्या वकीलपदाला गवसणी
शेतकऱ्याच्या मुलाची केंद्र सरकारच्या वकीलपदाला गवसणी ॲड.नारायण कोंडीबा सिरसट यांची भारत सरकारकडून निवड ◆श्रीकृष्ण उबाळे बीड : अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातील सुपुत्र ॲड . नारायण कोंडीबा सिरसट यांची भारत सरकारकडून बीड जिल्ह्यासाठी केंद्र सरकारचे वकील म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे बीड जिल्ह्यात अभिमानाची लाट पसरली आहे. पुढील तीन वर्षे ते या पदावर कार्यरत राहणार आहेत. मुळगाव वडगाव (कळसंबर), ता. बीड येथील सिरसट कुटुंबीयांची उपजीविका शेतीवर अवलंबून होती. आई-वडील शेतात राबून कुटुंब चालवत होते. अशा सामान्य शेतकरी घरातून आलेल्या नारायण यांनी बालपणापासूनच संघर्षाचा सामना करत शिक्षणाची कास धरली. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडगाव येथे झाले. त्यानंतरचे शिक्षण वडगाव हायस्कूल व नूतन कुंदकेश्वर विद्यामंदिर, कळसंबर येथे पूर्ण केले. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अकरावी-बारावीचे शिक्षण योगेश्वरी महाविद्यालय, अंबाजोगाई येथे घेतले. त्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथून बीए पदवी संपादन केली. कायद्याचे शिक्ष...