Posts

Showing posts with the label सुमीत बरदाडे

रिक्षातून स्वप्नांच्या रुग्णालयात- सुमीत बरदाडेची प्रेरक यशोगाथा-नीट परीक्षेत ५११ गुण

Image
रिक्षातून स्वप्नांच्या रुग्णालयात- सुमीत बरदाडेची  प्रेरक यशोगाथा बीड तालुक्यातील जाधववाडी गावातील बनणार पहिला 'डॉक्टर' ◆श्रीकृष्ण उबाळे, बीड ◆मो.9405344642 बीड:  स्वप्नं मोठी पाहायची, कारण तीच आपल्याला आयुष्याच्या पुढच्या थांब्यावर पोहोचवतात..कधी कधी, मोठ्या शहरात नाही, तर एखाद्या छोट्याशा गावात एक मोठं स्वप्न उगवतं...जसं नाव जाधववाडी. बीड तालुक्यातील च-हाटा ग्रामपंचायतीमधील हे छोटंसं, पण जिद्दी स्वप्न असलेलं गाव. आणि इथलंच एक तेजस्वी स्वप्न म्हणजे — सुमीत संजय बरदाडे. सुमीतचे वडील संजय बरदाडे यांचे शिक्षण बारावीपर्यंत. आई अर्चना ताईंचं शिक्षण दहावीपर्यंत. घरात शेती थोडीशीच. जगायचं कसं? तर वडील दिवसभर आपल्या आप्पे रिक्षावर लोकांना ने-आण करत राहतात. स्वप्न कोणतं होतं? घरातला मुलगा एक दिवस डॉक्टर व्हावा...शेवटच्या गावातल्या रुग्णालाही हाक मारणारा, दिलासा देणारा डॉक्टर. कदाचित रिक्षाच्या आवाजातच सुमीतने जिद्द ऐकली...आणि वडिलांच्या घामातच स्वतःचं भवितव्य पाहिलं. शाळा गावी, अभ्यास मनापासून केला. सुमीतचं शिक्षण सुरू झालं जि.प. प्राथमिक शाळा, जाधववाडी इथून. पाचवी...