Posts

Showing posts with the label पिल्लू

कुत्र्याच्या तावडीतून निलगाईच्या पिल्लाला वाचवले

Image
■🦌 "नीलूचं सुटणं" 🦌■ ◆श्रीकृष्ण महाराज उबाळे, बीड ◆मो.9405344642 आज दुपारची वेळ होती. आम्ही गुरुजी मंडळी जेवायला बसलो होतो. एवढ्यात आमचं एका चिमुकल्याने आमच्याकडं धाव घेतली. "सर, सर... गेटजवळ कुत्रं हरणाच्या पिल्लाला चावतंय!" हे ऐकताच मी एकदम उभं ठाकलो. मी ताबडतोब तिकडं पळत गेलो. तिकडं पोचलो तर काय, एक छोटंसं पिल्लू धसकटून बसलं होतं, तोंडाला थोडंफार रक्त लागलेलं. त्याच्या मागे एक कुत्री लागलेली, पण काही धाडसी मुलांनी धडपडत त्या कुत्रीला हुसकावून लावलं होतं. "सर, हरण दिसतंय हं हे!" – एका मुलाचं म्हणणं. मी नीट पाहिलं, तर ते हरण नव्हतं, तर ते होतं नीलगायचं पिल्लू! अगदी छोटूशं, लाजरं, घाबरलेलं. मी मुलांना शांत बसायला सांगितलं. "गोंधळ नाय करायचा. हे बिचारं थरथर कापतंय." मी त्याच्या अंगावरून हात फिरवला. मुलांनीही मायेने त्याला हात लावला. त्याच्या तोंडातून थोडंफार रक्त दिसत होतं. दोन-तीन ठिकाणी चावलेलं होतं. एक मुलगा पाण्याची बाटली घेऊन आला. मी हळूच त्याला पाणी पाजलं. पिल्लू थोडंसं विश्वासाने बघू लागलं. त्यानंतर सर्व मुलांना मैदानामध्ये बस...