Posts

Showing posts with the label म्हातारी माणसं

म्हातारी माणसं ओझं ठरत आहेत की कटकट

Image
●◆म्हातारी माणसं ओझं ठरत आहेत की कटकट◆● ◆श्रीकृष्ण महाराज उबाळे, बीड ◆9405344642 बीड शहराच्या एका रस्त्यावर नारायण भोंडवे बाबा भेटले. त्यांच्या म्हणण्यानुसार ते पाटोदा तालुक्यातील आहेत. साधे मळालेले कपडे, धोतर, डोक्यावर टोपी, हातात काठी, कपाळावर गंध, गळ्यात भगवा गमजा आणि चेहऱ्यावर थोडा थकवा, असमाधान.....! ते रस्त्यावरुन जाताना वाटेत थांबतात, कुणालातरी काही पैसे मागतात. जेवणासाठी थोडीशी मदत करा दादा असं म्हणतात...! आम्ही त्यांच्याशी बोललो, त्यांना मदतीचा हात दिला, आणि थोड्या संवादातून त्यांच्या जगण्याचा एक गहिरा पैलू समोर आला. ते सांगतात – "पाच मुलं आहेत, दोन मुली आहेत. शेती आहे, वाडी आहे. पण... काहीतरी बिनसलं." हे “काहीतरी” म्हणजेच सामाजिक भीषणतेचा मुळ प्रश्न आहे. ◆ म्हातारी माणसं शहरांमध्ये का येतात?: आपल्या गावांमध्ये, खेड्यांमध्ये, अनेक जुनी माणसं आज शहरांमध्ये फिरताना दिसतात – झेंडं, फोटो, कधी रुद्राक्षमाळा घेऊन, कधी एखादी विठ्ठलाची गाथा म्हणत, आणि बहुतेक वेळा "दहा रुपये द्या हो" म्हणत. हे चित्र पाहताना डोळ्यांत पाणी येतं, पण नंतर विचार क...