Posts

Showing posts with the label दोहे

संत तुकाराम महाराजांचे दोहे दोहा क्रमांक-२

Image
●◆तुकोबांचे शब्दधन◆● संत तुकाराम महाराजांचे दोहे             क्रमांक-२  "रामराम कहे रे मन। औरसुं नहीं काज । बहुत उतारे पार। आघे राख तुकाकी लाज ॥"       या दोह्यात संत तुकाराम महाराज आपल्याच मनाला एक प्रेमळ पण ठाम सल्ला देतायत. ते म्हणतात, "हे मना, तू फक्त रामाचं नामस्मरण करत जा, इतर गोष्टीत तुला काही घेणंदेणं नाही." म्हणजे काय, तर या जगात अनेक गोष्टी आकर्षक वाटतात – पैसा, माया, मान-सन्मान, हौस, नवलाई, परंतु या सगळ्या गोष्टी क्षणभंगुर आहेत. या गोष्टी काही केल्या आपल्याला परमेश्वराच्या वाटेवर नेणार नाहीत. त्या फक्त मनाला गुंतवतात, आणि गोंधळ घालतात. तसेच अध्यात्मिक क्षेत्रात अनेक मार्ग आहेत. यामध्ये योग, यज्ञ, कर्मकांड, तंत्रमंत्र, बळी नवस तसेच इतर अनेक कठीण मार्ग आहेत. संत तुकाराम महाराज सांगतात की, "हे मना, तू इतर साधनांमध्ये, दांभिकपणात, आडमुठेपणात, आंगठीधारी बाबांच्या भूलथापांमध्ये नको गुंतूस. फक्त ‘रामराम’ म्हणायचं, तोच खरा साधनाचा रस्ता आहे. आणि तो सगळ्यात सोपा आहे." या दोह्यामध्ये ‘रामराम’ हा शब्द केवळ देवाचं नाव म्हणून न...

संत तुकाराम महाराजांचे दोहे-१

Image
      दोहा क्रमांक- १  "तुका बस्तर बिचारा काय करे रे । अंतर भगवा न होय। भीतर मैला कब मिटो रे । मरे उपर धोय ॥"            जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी या दोह्यामध्ये केवळ वस्त्राचे भगवेपण न धरता, मनाचे भगवेपण, अंतःकरणातील वैराग्य आणि त्यागाचे महत्व अधोरेखित केले आहे. त्यांनी यामधून असा संदेश दिला आहे की, वरवर भगवे कपडे परिधान करून कोणी साधू, संन्यासी, त्यागी बनत नाही. खरी साधना आणि वैराग्य हे अंतःकरणातून उत्पन्न व्हावे लागते. "तुका बस्तर बिचारा काय करे रे" या ओळीतून त्यांनी ‘बस्तर’ म्हणजे वस्त्र – कपडे – याबद्दल बोलताना एक करुण भाव व्यक्त केला आहे. जर एखाद्या व्यक्तीने फक्त वरून भगवे वस्त्र घातले आणि त्याच्या अंतरात्म्यात वैराग्य नाही, त्यागाची भावना नाही, तर त्याच्यावर परिधान केलेले वस्त्र काही उपयोगाचे नाही. म्हणूनच ते भगवे वस्त्र ‘बिचारे’ ठरते, कारण ते फक्त एक ढोंग झाकून ठेवते. "अंतर भगवा न होय" – जर अंतःकरणात भगव्या रंगाचा अर्थ, म्हणजे त्याग, साधुता, आत्मशुद्धी, निर्लोभी वृत्ती, हे नसेल तर भगवे वस्त्र परिधान करून काही उ...