Posts

Showing posts with the label वारकरी

पंढरीची आषाढी वारी २०२५- एक आत्मानुभूती

Image
◆पंढरीची आषाढी वारी – एक आत्मानुभूती◆ ◆श्रीकृष्ण महाराज उबाळे ◆मो.9405344642           आषाढी एकादशी... भक्तांच्या जीवनातील सर्वोच्च पर्व. आमच्यासाठी ती केवळ एक धार्मिक घटना नव्हती, तर आत्म्याच्या पंढरीकडे झालेली यात्रा होती. शनिवार रात्री दोन वाजता झोप लागली आणि आश्चर्य म्हणजे रविवारी पहाटे पाचलाच जाग आली. एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. मी वारकरी सेवा केंद्रात जाऊन फ्रेश झालो, थंड पाण्याच्या टँकरखाली अंघोळ केली. तुकाराम महाराज घाडगे यांची दिंडी होती तिथेच आमची गाडी लावली. सकाळच्या शांततेत चहा, भाजलेल्या शेंगा आणि थोडीशी साबुदाणा खिचडी खाल्ल्यावर वाखरीहून पंढरीकडे चालण्याचा निर्धार केला. मार्गक्रमण सुरू झालं… ओठांवर अभंग, हाती टाळ, मनात विठ्ठल. जे अभंग पाठ नव्हते, ते मोबाईलमधून पाहून म्हणत होतो. "विठ्ठल" नाव जिथे जिथे आले, तो प्रत्येक अभंग आम्ही तोंडून घेतला. वाटेतील प्रत्येक पायरी ही जणू विठ्ठलाकडे नेणारी होती. प्रत्येक वळणावर विविध दिंड्या, ढोल, मृदंग, झांज, टाळकरी, विणेकरी, बुवा, माऊल्या, लहान थोर नाचत, गात विठ्ठलनामात रंगलेले दिसत होते. पोलिस, होमगार...

वाट ही चालावी पंढरीची

Image
टाळी वाजवावी गुढी उभारावी ।  वाट हे चालावी पंढरीची ॥१॥ पंढरीचा हाट कउलांची पेठ ।  मिळाले चतुष्ट वारकरी ॥२॥ पताकांचे भार मिळाले अपार ।  होतो जयजयकार भीमातीरी ॥३॥ हरिनाम गर्जतां भय नाहीं चिंता ।  ऐसें बोले गीता भागवत ॥४॥ खट नट यावें शुद्ध होऊनि जावें ।  दवंडी पिटी भावें चोखामेळा ॥५॥ हाताने टाळी वाजवावी, खांद्यावर ध्वज घ्यावा आणि भक्तांनी पंढरपूरच्या दिशेने निघावे. भक्तिभावाने उत्साहात टाळ वाजवत, विजयाची गुढी हाती घेऊन पंढरपूरच्या वारीच्या वाटेवर चालायला हवे.  पंढरी म्हणजे जणू एक भक्तीची पेठ आहे, जिथे भक्त (वारकरी) चारही दिशांमधून एकत्र येतात. पंढरपूर हे भक्तांचे धर्मपीठ असून, इथे चारही दिशांमधून आलेले वारकरी एकवटतात. हाती ध्वज (पताका) घेऊन हजारो वारकरी एकत्र होतात आणि भीमा नदीच्या काठी जयघोष करतात. भीमा नदीच्या किनाऱ्यावर अनंत पताका फडकत असतात आणि भक्तजनांचा जयजयकार आसमंत दुमदुमवतो. हरिनामाचा उच्चार करताना ना भय उरतं, ना चिंता. गीता आणि भागवतही हेच सांगतात. हरिनामस्मरण हेच चिंता, भय आणि दुःखाचा नाश करणारे आहे. भगवद्गीता व भागवत धर्मग्रंथ देखील हेच...

संत जनाबाई वारी अभंग

Image
"कीर्तनाचा रस आवडे नरासी ।  लागती पायांसी मुक्ति चार्‍ही ॥१॥ वारी पंढरीचा निश्चयें म्यां केला ।  वारकरी झाला पंढरीचा ॥२॥ मोक्षाचा जो मोक्ष मुक्तीची जे मुक्ती ।  जनी म्हणे किती सांगुं फार ॥३॥" माणसाला कीर्तनाचा (भगवंताच्या नामस्मरणाचा, भजनाचा, प्रवचनाचा) रस आवडू लागतो, तेव्हा त्याच्या चरणी (पायाशी) चारही मुक्ती (सालोक्य, सामीप्य, सारुप्य, सायुज्य) आपोआप येऊन उभ्या राहतात. भक्तीच्या मार्गानेच मुक्ती मिळते, असा हा भाव आहे. मी पंढरपूरच्या वारीचा ठाम निश्चय केला आहे. त्यामुळे मी आता खरा पंढरीचा वारकरी झालो आहे. (वारी म्हणजे केवळ चालण्याचे कष्ट नव्हे तर अंतःकरणाने विठोबाला समर्पण.) संत जनाबाई महाराज म्हणतात, "मोक्षामध्ये जो खरा मोक्ष आहे, मुक्तीत ज्या मुक्तीचा सार आहे तो वारीत आहे. हा अनुभव मी मिळवला आहे. मी हे किती सांगू, शब्द अपुरे पडतात. हा माझा  अनुभव खूप गूढ आणि व्यक्तिगत आहे." जय जगद्गुरू....! जय विठ्ठल....! ◆श्रीकृष्ण महाराज उबाळे ◆मो.9405344642 #वारीचीभावना #कीर्तनसेमुक्ती #वारकरीसंप्रदाय #पंढरीचीओढ #हरिपाठाचीगोडी #विठूमाउली #भक्तीरस #नामस्मरण #मुक्तीच...

संत नामदेव महाराज अभंग

Image
भेटिलागीं माझा फुटतसे प्राण । काया वाचा मनें जीवेंभावें ॥१॥ जया देखे तया पुसें हेंचि मात । कैं मज अनंत बोलावील ॥२॥ संतसमागमें दसरा दिवाळी । ठेवूनि निढळीं बाहे सदा ॥३॥ सखे पंढरीचे येती वारकरी । आर्त निरंतरीं त्यांचे पायीं ॥४॥ नामा म्हणे ऐसें करी दंडवत । आमुतें पुनीत करी बापा ॥५॥ भगवंताची भेट घडावी म्हणून माझा जीव तळमळतो आहे. शरीर, वाणी, मन, प्राण आणि भावनांनाही भगवंताच्या भेटीची आस लागली आहे. प्रत्येक अंगामधून, विचारांमधून, भावनांमधून एकच आर्त ध्वनी उमटतो — "मला माझा पांडुरंग भेटावा...!'' ही उत्कंठा इतकी तीव्र आहे की, भक्ताचं अस्तित्वच केवळ भगवंताच्या भेटीसाठी झुरतं आहे. जे कोणी भेटेल, त्याला मी हेच विचारतो- "अनंत (भगवंत) मला कधी भेटणार? तो मला कधी बोलावणार?" संत नामदेव महाराजांचा जीवच इतका अनावर झाला आहे की, प्रत्येक माणसाकडे त्यांना एकच प्रश्न पडतो-"माझ्या पांडुरंगाची भेट कधी होईल ?" ही भावना भक्ताच्या अंतर्मनातील अखंड, अधीर प्रश्न आहे. संतांचा संग म्हणजे माझ्यासाठी दसरा आणि दिवाळी..! भक्त असे म्हणतो की, सणवार नसले तरी संतांचा संग मला सदैव ...