गरज सरोआणि वैद्य मरो
◾गरज सरो आणि वैद्य मरो ◾ एखाद्या कादंबरीत असावी अशी घटना. चार वर्षांपूर्वी बीड शहरात घडलेली. माणसाच्या स्वार्थी वृत्तीचं, उपकार विसरण्याचं आणि गरज संपली की माणसं कशी बदलतात याचं जिवंत उदाहरण. बीड येथील एका सामाजिक संस्थेने मोठ्या कष्टानं वृद्धाश्रम सुरू केलं होतं. फार मोठ नाही, पण स्वच्छ, माणुसकी जपणारं, प्रेमाने चालणारं. तेथे येणारे वृद्ध म्हणजे आयुष्याने थकलेले, नात्यांनी फसवलेले, संसाराने झिजवलेले. अशाच एका दुपारी आश्रमाच्या दारात एक वृद्ध जोडपं उभं होतं. साधी कपडे, अंगावर थकव्याची झाक, डोळ्यांत भीती आणि आसरा द्यावा ही अपेक्षा यांचा विचित्र संगम. वय साधारण साठच्या आसपास. त्यांना मुलबाळ नव्हते. आयुष्यभर सरकारी सेवेत काम केलेलं. पती मंडळ अधिकारी होते. पण काही कारणाने त्यांची सरकारी सेवेतून बडतर्फी झाली होती. ती अन्यायकारक असल्याचं त्यांना वाटत होतं, म्हणून त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. केस चालू होती. पण केस चालू असताना नोकरी गेली, पगार थांबला, आणि आयुष्याची गाडी रुळावरून घसरली.नोकरी हेच त्यांचं जगण्याचं एकमेव साधन होतं. सुरुवा...