बचक
◆●बचक●◆ अजून अंधार पडला नव्हता. साडेसहा वाजले असतील. आभाळात थोडा केशरी रंग पसरला होता, आणि दिव्यांची लखलख सुरू झाली होती. मी बीड शहरातल्या पालवन चौकाच्या भाजी मंडईत गेलो. कोरोना लागल्यानंतर ही मंडई तिथं बसू लागली. रांगेनं शेतकरी आपापल्या टोपल्या, पोती, गाडी घेऊन बसलेले. कुणाच्या टोपलीत टवटवीत वांगी, कुणाच्या गाठीत मिरच्या, कुणाच्या ढिगात भोपळा… सगळीकडे ताज्या भाज्यांचा वास. मी चालता चालता भाजी बघत होतो. एका कोपऱ्यात एक शेतकरी दादा बसले होते, गव्हाळ रंग, डोक्यावर जुनं टॉवेल, आणि पायात चप्पल. त्यांच्या टोपलीत ताज्या-ताज्या मुगाच्या शेंगा होत्या. शेंगांचा हिरवा रंगच असा होता की पाहताच हात पुढं जाईल. मला त्या खूप आवडतात, म्हणून मी भाव विचारला. शेतकरी दादा म्हणाले, "पन्नास रुपयाला अर्धा किलो, तीस रुपयाला पावशेर." मी होकार देणार इतक्यात माझ्या अगोदर एक बऱ्यापैकी देखणा ग्राहक त्यांच्याकडं उभा होता. कपड्यांवरून आणि वागण्यावरून तो चांगल्या घरातला, कदाचित नोकरी कर...