Posts

Showing posts with the label विठ्ठल

पंढरीची आषाढी वारी २०२५- एक आत्मानुभूती

Image
◆पंढरीची आषाढी वारी – एक आत्मानुभूती◆ ◆श्रीकृष्ण महाराज उबाळे ◆मो.9405344642           आषाढी एकादशी... भक्तांच्या जीवनातील सर्वोच्च पर्व. आमच्यासाठी ती केवळ एक धार्मिक घटना नव्हती, तर आत्म्याच्या पंढरीकडे झालेली यात्रा होती. शनिवार रात्री दोन वाजता झोप लागली आणि आश्चर्य म्हणजे रविवारी पहाटे पाचलाच जाग आली. एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. मी वारकरी सेवा केंद्रात जाऊन फ्रेश झालो, थंड पाण्याच्या टँकरखाली अंघोळ केली. तुकाराम महाराज घाडगे यांची दिंडी होती तिथेच आमची गाडी लावली. सकाळच्या शांततेत चहा, भाजलेल्या शेंगा आणि थोडीशी साबुदाणा खिचडी खाल्ल्यावर वाखरीहून पंढरीकडे चालण्याचा निर्धार केला. मार्गक्रमण सुरू झालं… ओठांवर अभंग, हाती टाळ, मनात विठ्ठल. जे अभंग पाठ नव्हते, ते मोबाईलमधून पाहून म्हणत होतो. "विठ्ठल" नाव जिथे जिथे आले, तो प्रत्येक अभंग आम्ही तोंडून घेतला. वाटेतील प्रत्येक पायरी ही जणू विठ्ठलाकडे नेणारी होती. प्रत्येक वळणावर विविध दिंड्या, ढोल, मृदंग, झांज, टाळकरी, विणेकरी, बुवा, माऊल्या, लहान थोर नाचत, गात विठ्ठलनामात रंगलेले दिसत होते. पोलिस, होमगार...

विठ्ठल माहात्म्य: संत मुक्ताबाई महाराज

Image
"मुक्त जीव सदा होति पैं नामपाठें ।  तेचि रूप विटे देखिलें आम्हीं ॥१॥ पुंडलिके विठ्ठल आणिला पंढरी।  आणूनि लवकरी तारिलें जग ॥२॥ ऐसें पुण्य केलें एका पुंडालिकेची।  निरसली जनाची भ्रमभूली ॥३॥ मुक्ताई चिंतनें मुक्त पैं जाली।  चरणीं समरसली हरिपाठे ॥४॥"  जो जीव (माणूस) भगवानाचं नामस्मरण (नामजप) सतत करतो, तो नेहमीसाठी मुक्त होतो. आम्ही देखील पंढरपूरच्या विटेवर त्या नामाच्या रूपातच विठ्ठलाचं दर्शन केलं आहे.   पुंडलिकाच्या भक्तीमुळेच विठ्ठल पंढरपूरात आले. त्यानं इतक्या सहजतेने आणि लवकर भक्तीच्या जोरावर संपूर्ण जगाला तारण्याचं काम केलं. एका पुंडलिक नावाच्या भक्तानं इतकं मोठं पुण्य केलं की, त्यामुळे सर्व सामान्य जनतेच्या मनातील अज्ञानरूपी भ्रम नाहीसे झाले (निरसले). संत मुक्ताबाई महाराज म्हणतात, "मी भगवंताचं चिंतन केलं आणि मी स्वतः मुक्त झाले. मी भगवंताच्या चरणांमध्ये हरिपाठ करत करत पूर्णपणे एकरूप झाले." नामस्मरण, भक्ती, आणि पंढरीतील संतांची साधना याचा महिमा वर्णन केला आहे. नामस्मरणामुळे जीव मुक्त होतो. पुंडलिकाच्या भक्तीनं विठ्ठल पृथ्वीवर आला. न...

संत नामदेव महाराज अभंग

Image
भेटिलागीं माझा फुटतसे प्राण । काया वाचा मनें जीवेंभावें ॥१॥ जया देखे तया पुसें हेंचि मात । कैं मज अनंत बोलावील ॥२॥ संतसमागमें दसरा दिवाळी । ठेवूनि निढळीं बाहे सदा ॥३॥ सखे पंढरीचे येती वारकरी । आर्त निरंतरीं त्यांचे पायीं ॥४॥ नामा म्हणे ऐसें करी दंडवत । आमुतें पुनीत करी बापा ॥५॥ भगवंताची भेट घडावी म्हणून माझा जीव तळमळतो आहे. शरीर, वाणी, मन, प्राण आणि भावनांनाही भगवंताच्या भेटीची आस लागली आहे. प्रत्येक अंगामधून, विचारांमधून, भावनांमधून एकच आर्त ध्वनी उमटतो — "मला माझा पांडुरंग भेटावा...!'' ही उत्कंठा इतकी तीव्र आहे की, भक्ताचं अस्तित्वच केवळ भगवंताच्या भेटीसाठी झुरतं आहे. जे कोणी भेटेल, त्याला मी हेच विचारतो- "अनंत (भगवंत) मला कधी भेटणार? तो मला कधी बोलावणार?" संत नामदेव महाराजांचा जीवच इतका अनावर झाला आहे की, प्रत्येक माणसाकडे त्यांना एकच प्रश्न पडतो-"माझ्या पांडुरंगाची भेट कधी होईल ?" ही भावना भक्ताच्या अंतर्मनातील अखंड, अधीर प्रश्न आहे. संतांचा संग म्हणजे माझ्यासाठी दसरा आणि दिवाळी..! भक्त असे म्हणतो की, सणवार नसले तरी संतांचा संग मला सदैव ...