वैचारिक दहशतवाद : लोकशाहीला गळा दाबणारी नवी यंत्रणा
वैचारिक दहशतवाद : लोकशाहीला गळा दाबणारी नवी यंत्रणा आपण २१व्या शतकात आहोत, जग झपाट्याने पुढे जात आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, वैचारिक प्रगल्भता यामध्ये मानवी इतिहासात आजवर कधीच नव्हता इतका विकास झाला आहे. पण दुर्दैवाने, भारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये आज "विचार मांडणं" हे गुन्हा ठरत आहे. व्यक्ती स्वातंत्र्याची ग्वाही देणाऱ्या संविधानाच्या या भूमीत जर कोणी सत्य मांडत असेल, विद्रूपतेवर बोट ठेवत असेल, इतिहासाची चिकित्सा करत असेल – तर त्याला चूप करण्यासाठी सरळ हत्या केली जाते. हे लोकशाहीचे लक्षण नव्हे, तर ही वैचारिक दहशतवादाची टोकाची विकृती आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे, कलबुर्गी यांचं काय चुकलं होतं? त्यांनी कोणाला मारलं? त्यांनी कोणाचा धर्म पायदळी तुडवला? त्यांनी फक्त प्रश्न विचारले. अंधश्रद्धा, जात, धर्म या ढोंगांमागचं सत्य लोकांसमोर मांडलं. पण याच विचारांमुळे त्यांचा काटा काढण्यात आला. समाजाने जिथं अशा विचारवंतांचा सत्कार व्हायला हवा होता, तिथं त्यांना बुलेट मिळाली. आजही या हत्याकांडांचे मास्टरमाइंड को...