Posts

Showing posts with the label #JusticeForSantoshDeshmukh#VaibhaviDeshmukh#FasachiMaang#NEETSuccess#MaharashtraJustice#SaluteToCourage #NEET551 #GovtMedicalCollege #VaibhaviDeshmukh #Massajog #SantoshDeshmukh #InspirationalStory #S

वैभवी देशमुख – अश्रूंमधून उभं राहिलेलं यश

Image
वैभवी देशमुख – अश्रूंमधून उभं राहिलेलं यश बारावीला ८५%  तर निटमध्ये मिळवली पात्रता ◆ श्रीकृष्ण उबाळे, बीड ◆मो.9405344642 महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील एक छोटंसं गाव – मस्साजोग...! इथूनच जन्माला आली एक मुलगी – वैभवी देशमुख......! आई-वडिलांचं आर्जव, गावकऱ्यांचा जीव की प्राण असलेले सरपंच संतोष देशमुख यांची लाडकी लेक. पण नियतीनं क्रूर खेळ मांडला...एक दिवस अचानकच एक हृदयद्रावक घटना घडली – संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली. महाराष्ट्र हादरला. संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त झाली. पण या काळोख्या घटनेच्या सावलीतही एक तेजस्वी दिवा शांतपणे पेटलेला होता – वैभवी. आईचं अश्रूंनी ओथंबलेलं पदर, समाजाचं सांत्वन, पोलिस चौकशी, कोर्ट-कचेऱ्या…हे सगळं चालू असतानाही वैभवीच्या हातात कायम एक पुस्तक होतं. दोन तासांचा अभ्यास तिनं एका मिनिटासाठीही थांबवला नाही. वडिलांच्या चेहऱ्याचं शेवटचं स्मरण हृदयात साठवून तिनं आपली ध्येयशक्ती दुपटीनं वाढवली. वडिलांना न्याय मिळावा म्हणून ती प्रत्येक आंदोलनात, मोर्चात पुढे होती. आणि घरी आल्यावर पुन्हा शांतपणे अभ्यासाच्या पुस्तकात डोकं खुपवायची. कितीही अश्रू आले ...