राजवीर कोकाटचे जेईई ऍडव्हान्सड परीक्षेत यश देशात 32वा
◆●ड्रायव्हरचा मुलगा ठरला बीडचा अभिमान; जेईई ऍडव्हान्सड परीक्षेत देशात ३२वा क्रमांक●◆ अपंगत्वावर मात करत राजवीर कोकाटची आयआयटीत भरारी ◆श्रीकृष्ण उबाळे, बीड बीड – कष्ट करणाऱ्या आई-वडिलांच्या संघर्षातून उभं राहिलेलं एक स्वप्न... आणि त्या स्वप्नाला यशाच्या आकाशात भरारी देणारा राजवीर भरत कोकाट हा बीड जिल्ह्यातील एक विद्यार्थी. मूळ गाव गेवराई तालुक्यातील ठाकर आडगाव येथून आलेल्या राजवीरने जेईई ऍडव्हान्सड परीक्षेत अपंगांच्या खुल्या प्रवर्गातून संपूर्ण भारतात ९३वा तर अपंगांच्या इतर मागास प्रवर्गातून देशातून ३२वा क्रमांक पटकावत बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचं नाव उज्वल केलं आहे. राजवीरचा प्रवास हा खरोखर प्रेरणादायी आहे. एका हाताने अपंगत्व असूनही त्याने कधीही हार मानली नाही. अभ्यासात सातत्य राखत तो यशाच्या शिखरापर्यंत पोहोचला. त्याचे प्राथमिक शिक्षण ठाकर आडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत १ ली ते ७ वी पर्यंत झाले. त्यानंतर दहावीचे शिक्षण बीडमधील यशवंत विद्यालय येथे पूर्ण करत ७८ टक्के गुण मिळवले. बारावीचे शिक्षण त्याने साक्षाळपिंपरी कनिष्ठ महाविद्यालय येथे घेत ७९ टक्के ...