शेतकरी बापाच्या शेतमळ्यावर मुलींनी फुलवली ‘खाकी’ची बाग
●◆शेतकरी बापाच्या आंबिका◆● शेतकरी बापाच्या शेतमळ्यावर मुलींनी फुलवली ‘खाकी’ची बाग नंदपूर येथील चंद्रसेन उबाळेंच्या चार मुली पोलीस दलात बजावताहेत सेवा बीड : बीड जिल्ह्याचा उल्लेख झाला की समाजमनात अजूनही काही कटू वास्तव दाटून येते – मुलगी नको अशी मानसिकता, गर्भपातात आघाडी, बालविवाहाची परंपरा… पण हाच बीड जिल्हा आज एका शेतकरी बापामुळे आणि त्याच्या चार मुलींमुळे अभिमानाने डोकं उंचावतो आहे. कारण गेवराई तालुक्यातील नंदपूर गावातील चंद्रसेन उबाळे या शेतकरी बापाच्या कष्टाच्या मळ्यावरून उभ्या राहिल्या आहेत चार खाकीधारी मुली. चंद्रसेन आणि संगिता उबाळे या दाम्पत्याने पाच मुलींच्या संगोपनात मुलगा-मुलगी असा कधीच भेदभाव केला नाही. शिक्षण आणि संस्कार या दोन गोष्टींचं बी त्यांनी आपल्या मुलींच्या मनामनात पेरलं. “तुम्ही तुमचं स्वप्न पहा, कष्ट करा, प्रामाणिकपणे समाजात जगा,” या बोधवाक्यानंच उबाळे कुटुंब उभं राहिलं. यातूनच मोठी मुलगी ज्योती उबाळे हिने २०१४ मध्ये बीड जिल्हा पोलीस दलात भरती होऊन सध्या माजलगाव येथे सेवा सुरू आहे. दुसरी मुलगी अश्विनी उबाळे २०२१ मध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस द...