Posts

Showing posts from April, 2021

कोरोनावर उपाय

वात्रटिका कोरोनावर उपाय वाटत असेल देशातून संपूर्ण कोरोना जावा एकच उपाय करा लगेच निवडणुका लावा निवडणुका आहेत तिथे कोरोनाची बत्ती गुल्ल निवडणुका नाहीत तिथे दवाखाने हाऊस फुल्ल -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.९४०५३४४६४२

लुटीचा राजमार्ग

Image
वात्रटिका  लुटीचा राजमार्ग संकटाला संधी बनवून माणूस माणसाला लुटतोय मोहाच्या लांब जिभेने माणसाचंच रक्त चाटतोय इंजेक्शनच शॉर्टेज लुटीचा राजमार्ग नरकातील किड्यांना काय सांगावा स्वर्ग ? -श्रीकृष्ण उबाळे, बीड मो.९४०५३४४६४२

कावळ्यांचा शाप

Image
वात्रटिका कावळ्यांचा शाप मेंदूतील प्रदर्शनाशिवाय काहींचे पोट भरत नाही कावळ्यांच्या शापाने गाय कधीच मरत नाही या अशा अभिव्यक्तीला सांस्कृतिक वारसा आहे स्वतःच स्वतःला विचारा तुमचं मन आरसा आहे -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.९४०५३४४६४२