वात्रटिका 'राज'मुद्रा शिवराय वापरल्याशिवाय राजकारण्यांचे भागत नाही त्यांच्या विचारांना मात्र कोणीच कधी जागत नाही राजकीय मुखवट्यांचा रंग दुट्टपी आणि दळभद्रा आहे झेंड्यासोबत बदललेली राजगडाची राजमुद्रा आहे -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.९४०५३४४६४२
वात्रटिका उचापती मोठेपणा दाखवण्यासाठी भाट करतात उचापती पुन्हा पुन्हा नवनव्या वादात अडकतात छत्रपती सारवासारव करताना वड्याचे तेल वांग्यावर जयभगवान प्रसिद्ध झाला विरोधाच्या टांग्यावर -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.९४०५३४४६४२
वात्रटिका सहाशे दोन बांगल्याच्या नावाने अंधश्रद्धा जोपासता स्वतःचं पुरोगामीत्व सांगा कधी तपासता ? बोल बोलता वाटे सोपे करताना मात्र फाटते सहाशे दोनची मंत्र्यांनो सांगा का भीती वाटते ? -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.९४०५३४४६४२ Visit : aajchitika.blogspot.in वाचा रोज नव्या वात्रटिका...!