बापकमाई

कविता

बापकमाई

लगडलेलं बहरलेलं 
बाप नावाचं एक झाड 
सावली देतं पोट भरतं 
रसासाठी बनतं पाड

त्याचे जेवढे लेकरं
घेतात त्याला वाटून
हापापलेपणा पाहून
डोळ्यात येतं दाटून

वेगळेपणा असेनाका
रहा बाबांनो सुखात
बापकमाईचं उत्पन्न
जाऊद्या साऱ्या मुखात

अनेक वर्षे फळ देत
झाड शेवटी वाळून गेलं
बहरलेलं त्याचं वैभव
सारं सारं गळून गेलं

बापाच्या काटक्या जाळून
चुली पोरांच्या पेटत होत्या
बापाने कमावलंच काय ?
चर्चा रटरटत होत्या....!!😢

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी