ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

"ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत"

◆श्रीकृष्ण महाराज उबाळे, बीड
◆मो.9405344642
संतांची भूमी, भक्तीचा वारसा लाभलेली... बीड जिल्ह्यातील तळेगाव या छोट्याशा गावात जन्मलेला एक तेजस्वी, संतवाणीने झपाटलेला चेहरा –
तो म्हणजेच ह.भ.प. योगेश महाराज घोलप. अत्यंत लहान वयातच कीर्तनाची गोडी लागलेली, आणि ती गोडी केवळ आवड नव्हे तर एक ध्यास बनली. आळंदीतील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत वारकरी धर्मशिक्षण घेतले आणि आपल्या आयुष्याचं उद्दिष्टच ठरवलं – “नामप्रचार आणि समाजप्रबोधन.” स्वतः:च आळंदी येथे "श्री गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था" स्थापन करून आज ३५ विद्यार्थी नामधर्माच्या शिक्षणासाठी मार्गक्रमण करत आहेत, ही त्यांची सच्ची सेवा आहे. सोनी मराठी वाहिनीवरील "कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार" या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कीर्तन स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला आणि पहिल्याच फेरीत १०८ स्पर्धकांतून निवड झाली.

●पहिली फेरी – ‘नाम वाचे श्रवणी कीर्ती’ (संत निळोबाराय)

●दुसरी फेरी – ‘धर्माची तू मूर्ती’ (संत तुकाराम महाराज) आणि आता

●तिसरी व अंतिम फेरी – ‘आता भीत नाही देवा’ (संत जनाबाई)

या साऱ्या फेऱ्यांतून मार्गक्रमण करत त्यांनी अंतिम फेरीपर्यंत यशस्वी झेप घेतली आहे.

◆३६ कीर्तनकारांमध्ये अंतिम फेरीसाठी निवड:
अखेरच्या ३६ कीर्तनकारांमध्ये योगेश महाराजांची निवड झाली आहे. हे केवळ स्पर्धेचं यश नाही, हे आहे भक्तीची ताकद, शब्दांची प्रखरता आणि साधनेचा विजय. या कार्यक्रमाचे परीक्षण महाराष्ट्रातील कीर्तन क्षेत्रातील दोन दिग्गज – जगन्नाथ महाराज पाटील आणि राधाताई सानप करीत आहेत.

◆समाजासाठी बोलणारा, जनतेसाठी चालणारा कीर्तनकार :

योगेश महाराज हे केवळ किर्तनकार नाहीत, ते समाज जागृतीचे व्रत घेतलेले एक तरुण प्रबोधनकार आहेत. महाराष्ट्रभर त्यांच्या कीर्तनातून त्यांनी अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, नातेसंबंधांचे महत्त्व, स्त्री-सन्मान यावर प्रभावी समाजप्रबोधन करत आहेत. लोकांमध्ये विठ्ठलभक्ती, संतविचारांचा प्रसार प्रचार करीत आहेत.

◆तळेगाव, बीड आणि संपूर्ण वारकरी संप्रदायाचा अभिमान :

आज त्यांच्या या निवडीमुळे तळेगाव गाव, बीड जिल्हा, आणि संपूर्ण वारकरी संप्रदाय यांचं शिर ऊंच झालं आहे. त्यांच्या प्रयत्नातून एक गोष्ट पुन्हा अधोरेखित झाली – "माणूस जर मेहनत करत राहिला, तर देव त्याच्या मार्गात नामाची फुलं अंथरतो. ह.भ.प. योगेश महाराज घोलप यांना या अंतिम फेरीसाठी आणि भावी कीर्तन यात्रेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांच्या वाणीचा गंध, त्यांच्या शब्दांचा स्पर्श आणि त्यांच्या साधनेचा तेज अजून कित्येक जीवनांत प्रकाश घेऊन येवो.

✍️ लेखन: 
◆श्रीकृष्ण महाराज उबाळे, बीड
◆मो.9405344642

#श्रीकृष्णमहाराजउबाळे #बीडचेगौरव #कीर्तनसेवा
#भक्तिरसातमहाराज
#समाजप्रबोधन #वारकरीसंप्रदाय #प्रेरणास्थान
#संतविचार #भक्तिपंढरीची #ज्ञानमार्गदर्शक
#कीर्तनमार्ग #नम्रसेवक #मराठीसंस्कृतीचाAbhiman
#BhaktiWithPurpose #श्रीकृष्णउबाळेकीर्तन
Yogesh Gholap

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

माझी बीजमाय 'संजीवनी'