संत नामदेव महाराज अभंग
●◆तुकोबांचे शब्दधन ◆●
"भजन चालिले उपराटो । कोण जाणे खरे खोटे ।।
सजीवासी हाणी लाथा । निर्जीवापायी ठेवि माथा ।।
सजीव तुळशी तोडा । पूजा निर्जीव दगडा ।।
बेला करी मोडातोडी । शिवा लावोली रोकडी ।।
तोंड धरुनि मेंढा मारा । म्हणती सोमयाग करा ।।
सिंदूर माखुनिया थोडा । त्यासी भजति पोरे रांडा ।।अग्निहोत्राचा सुकाळ । कुशपिंपळाचा काळ ।।
मूर्तिकेची पूजा नागा । जित्यां नागा घेती अंग ।।
नामा म्हणे अवघे खोटे । एक हरिनाम गोमटे ।।"
- संत शिरोमणी नामदेव महाराज
संत नामदेव महाराजांची अतिशय तीव्र, परखड आणि जागृती निर्माण करणारी अभंगरचना आहे. यात त्यांनी समाजातील आंधळ्या श्रद्धा, ढोंगी पूजा-पद्धती, रुढीपरंपरा, मूर्तिपूजेचा अंधानुकरण आणि खोट्या धार्मिक आडंबरांवर स्पष्ट आणि निर्भीड टीका केली आहे.
'सध्या जे भजन, पूजाअर्चा चालू आहे ती उलटी, खोटी चालले आहे. कोणाला काय समजतंय, खरं-खोटं ओळखणं कठीण झालंय. काहीजणांना खरंखोटं कळूनही ते उलटं वागत आहेत. खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं कोण जाणून वागतय ?
जिवंत माणसाला आपण शिव्याशाप देतो, मारतो, लाथा मारतो, जिवंताला आपण विसरतो आणि निर्जीव दगडासमोर मात्र डोकं ठेवतो. ही मोठी विडंबनात्मक स्थिती आहे.
जिवंत असणारी तुळस तोडून आपण निर्जीव दगडावर ठेवतो. जीवाची किती ही अवहेलना आहे.
जिवंत असणाऱ्या बेलाच्या फांद्याला, पानाला तोडायचे आणि शिवाच्या दगडाच्या मूर्तीवर वाहायचे ही तर शंकराला दिलेली नगद शिवीच आहे. जिवंतावर अत्याचार, पण दगड मात्र पुजायचा.
मेंढ्याचे तोंड धरून त्याचा सोमयागात बळी देतो, तोंड धरून त्याला हाल करून मारतो, आणि म्हणतो यज्ञ केला. म्हणजे हिंसेला धर्माचं रूप दिलं.
थोडासा सिंदूर लावून धोंड्यापासून देवाची मूर्ती बनवली आणि त्याला लहान मुलं व बाया पूजतात.
अग्निहोत्र केलं जायचं, ते स्थळ आता, ओसाड पडलंय, कुशपिंपळ तोडून यज्ञात जाळले जात आहेत.
सापाच्या मूर्तीची पूजा करतो, पण जिवंत साप दिसल्यास मारून टाकतो. म्हणजे दगडाचा साप पूज्य वाटतो पण खरा सजीव नकोसा वाटतो.
संत नामदेव महाराज म्हणतात, हे सगळं खोटं आहे. खरा उपाय एकच भगवंताच्या हरिनामस्मरणातच खरे समाधान आहे. संत नामदेव महाराज इथे सांगतात की, देव म्हणजे केवळ मूर्ती नसून, तो जिवंत सजीवात आहे, माणसात आहे. सजीवांप्रती दया, प्रेम आणि सेवा हेच खरे धर्माचे रूप आहे. बाकी आंधळी, हिंसक किंवा ढोंगी पूजा म्हणजे केवळ खोटेपणा आहे. सर्व आडंबरांपासून दूर राहा, आणि “हरिनाम” (भगवंताचं स्मरण) हाच खरा धर्म आहे. हाच संतपरंपरेचा गाभा आहे — प्रेम, करुणा, नि:स्वार्थ सेवा आणि हरिनाम हेच गोड आहे.
संत नामदेव महाराज पुण्यस्मरण अभिवादन....!
#संतनामदेवमहाराज #नामदेवमहाराज #हरिनामगोष्टी #अभंगवाणी #नामस्मरण
#वारकरीसंप्रदाय #संतपरंपरा #भक्तिरस
#संतांचासंदेश #भक्ति_मार्ग #हरिनामएकसत्य
#संतांचेविचार #नामदेवअभंग #संतकविवर
#माळेमध्येभगवंत #प्रेमाचीभक्ति #मराठीसंत
#हरिनामाचेमहात्म्य #नामदेवमुक्तीमार्ग #संतनामदेवअभंग
Comments
Post a Comment