लोकशाहीचा चिकन मटण उत्सव — विचार खा, शुद्ध मटन प्या

📢 “लोकशाहीचा चिकन मटण उत्सव — विचार खा, शुद्ध मटन प्या!” 🍗🍖
लोकशाहीचा मूळ गाभा काय असतो?
विचार, चळवळ, मूल्यं, संघर्ष, सत्तेवर प्रश्न, जनतेचा आवाज...पण आता हे सगळं किचन मध्ये बदललंय!
आता मतासाठी योजना नाही, "मेनू" लागतो!
कोणता वॉर्ड, कोणता विभाग हे बघून वाटप ठरतं –
5000 किलो चिकन, हजारो बकऱ्यांचे बळी आणि त्यावर "आखाडा पार्टी" चा भपका. हेच लोक आहेत ना, जे दोन दिवसांपूर्वीच आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत होते…विठोबाच्या चरणी लीन होणारे, हरिनामाचा कळवळा दाखवणारे…आणि आता थेट  "मटन स्पेशल" घेऊन तुमच्या गल्लीपर्यंत पोहोचले आहेत. हे सगळं पाहून प्रश्न पडतो —ही लोकशाही आहे की लोकांची ‘शेळी-कोंबडी’ कापशाळा?

😂 “मत मागताना चिकन मटन वाटप!”

आजकाल राजकारणातलं "विकास" हे फ्रीझरमध्ये ठेवलेलं आहे, आणि बाहेर फक्त चिकन मटण आणि आखाड्याचं वितरण सुरू आहे. माणसं रांगेत उभी आहेत — शुद्ध विचारासाठी नाही, तर बोनलेस चिकनसाठी...!  "लोकशाहीच्या पिंजऱ्यात विचार बंद…लोकांच्या डोक्यात फक्त बिर्याणीच्या हाडांचा आवाज....आज संपूर्ण राजकीय नेतृत्व हे "प्यायलं खायलं देतो, पण विचार विचारू नका" अशा थाटात वागतंय. एका बॅनरवर विठोबा, दुसऱ्यावर चिकन —एकीकडे हिंदुत्वाच्या नावाने, चिकनच्या पंगतीत किती विरोधाभास...! 🐓 मटनाच्या तुकड्यांत मतांचं विभाजन चाललंय... किचनमध्ये खवय्या आणि स्टेजवर वक्ता— "भूक भागली की प्रश्न विचारले जात नाहीत!" हे पूर्वीही घडत होतं, पण ते गुपचूप होतं...आता बॅनर लावून, सोशल मीडियावर पोस्ट टाकून,आणि स्वतःची छायाचित्रं चिकनच्या पायावर छापून, हे सगळं खुलेआम होतंय. हेच महेश लांडगे, त्याच आमच्या लाडक्या पुजाताई मोरे मॅडम ज्यांच्यावर काय लिहावं...आम्ही तरी त्यांना आदर्श समजत होतो.... हेच मुंबईतले आमदार, हेच विविध पक्षीय "खासदार-खाद्यप्रेमी" जे शहरा-शहरात, गावागावात चिकन पार्टीचे हुकूमशहा बनलेत...!

📜 शेवटी संविधान हेच म्हणत असेल —
"धन्य ते उपाशी मतदार, धन्य ते बगळे नेते,
धन्य ती चिकन बिर्याणी, आणि धन्य ही ‘खावड लोकशाही’!"

🔚 लोकशाहीचा अखेरचा मंत्र:
विकास विचारू नका, फक्त “काय मेनू आहे?” ते विचारा…!

"लोकशाही जिंदाबाद...!
पण आधी चिकन मटन वाढा साहेब!" 🍖

◆श्रीकृष्ण महाराज उबाळे
◆मो.9405344642

Balaji Annasaheb Margude , डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 

#खावडीलोकशाही #चिकनमटणराजकारण #मताआधीमटन #विकासकिचनमध्ये #आखाडापार्टीलोकशाही #रांगेतीलमतदार #कोणतायोजना_कोणतामेनू #पंगतीचीप्रगती #विकासाचाहाडा #मतवीर_की_खाद्यवीर #संविधान_की_चिकनधान
#चिकनसमाजवाद #मटनवरशेपटी #लोकशाहीचेहाड

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'