शैक्षणिक सर्दी

आजची टिका....!!

*शैक्षणिक सर्दी*
------------------------

कुठं नुसती गर्दी
कुठं नुसता शुकशुकाट असतो
ना'वाजलेल्या' शाळेत शिक्षण
हा विचारच मुळात मोकाट असतो

नावाजलेल्या शाळेतील सगळेच
कलेक्टर होत नाहीत
साध्या शाळेतील सगळेच
वायाला जात नाहीत

शिक्षणापेक्षा माणूस पळतो
जिकडे गर्दी आहे
गर्दीकडे जाण्याची मानसिकता
ही शैक्षणिक सर्दी आहे....!!

      ✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
           मो.9405344642
      aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani