शब्द

आजची टिका....!!

    😋 शब्द 😋
------------------------------------

शब्दांनीच होतो अपमान
शब्दच कधी रडवतात
शब्दच कधी हसवतात
शब्दच तर घडवतात

शब्द जरा जपुन वापरा
शब्दच बनतात तलवार
शब्दांनीच होतात युद्ध
शब्दांनाच येते धार

शब्दांनीच 'त्यांचे'
खुप नुकसान झाले
म्हणून ते दुधासोबत
ताकही फुकुन प्याले...!!

    ✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
        मो.9405344642
aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'