शिक्षणाची गंगा

आजची टिका....!!

*शिक्षणाची गंगा*
***************

शिक्षणाची गंगा क्लासेसच्या पुरातून
विद्यार्थ्यांपर्यंत येऊ लागली
हीच आपल्या देशाची खरी
शैक्षणिक क्रांती होऊ लागली

क्लासेसचीच सारी चर्चा
पेपरातही त्यांचीच भरलेली पाने
शाळा कॉलेज चिरगुट चोखे
कोप-यात बारीक त्यांचे रकाणे

शाळा कॉलेज नावापुरते
क्लाससाठी विधार्थी हिंडत आहे
कोणी काहीच करीत नाही
पालक व्यवस्थेच्या नावाने भांडत आहे....!!

   ✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
         मो.9405344642
   aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'