लाटिंग

आजची टिका....!!

  *प्लॉटिंगची लाटिंग*
------------------------------
नद्या-नदयांचे नाले झालेत
भराव टाकून टाकून 'प्लॉटिंग' आहे
नैसर्गिक संसाधनांची ही
सरळसरळ बेकायदा 'लाटिंग' आहे

जरी अशा जागा
जीवावर बेतल्या जातात
ग्राहकही मिळतात त्यांना
त्या लगेच घेतल्या जातात

निसर्गच कोपेल कधीतरी
तोच अशांना दंड देईल
शहरा शहरांचा नक्कीच
एक दिवस उत्तराखंड होईल

      ✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
            मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी