सट्टा

आजची टिका....!!

*मान्सुनचा सट्टा*
****************

क्रिकेट सारख्या खेळाला
ज्याने लावला बट्टा
मान्सून कसा असेल ?
यावरही लागतोय सट्टा

सट्टा लावणा-यांना
पैशाची काय किंमत आहे ?
पाचशे कोटींची झाडे लावण्याची
सांगा कुणात हिंमत आहे ?

झाडे लावल्याने खरोखर
खुपकाही आपोआप होईल
सट्टा न लावताही पावसाचा
सर्वांना अंदाज सांगता येईल..!!

      ✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
            मो.9405344642
       aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'