सत्ता
आजची टिका....!!
*सत्ता*
------------
सत्ता काहीही करु शकते
सत्तेची कमालच न्यारी असते
विचार विरोधी असली तरी
सत्ता प्रत्येकाला प्यारी असते
कुणी कसाही उसळला तरी
सत्तेच्या दिशेने कोसळत असतो
भला भला रान पेटवणारा
'आम' किंवा 'खास' दारातुन
सत्तेच्या कळपात मिसळत असतो
ज्यांच्या मागे कळप दिसतात
त्यांना दारं उघडे असतात
विचारावर अनुयायी झालेले
नेहमीच सुतकी अन् नागडे असतात
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
aajchitika.blogspot.in
Comments
Post a Comment