पाया गमावलेली इमारत

वात्रटिका

पाया गमावलेली इमारत

विदेशीच्या मापाने
देशीपणा तोलत आहोत
मराठीची लाज वाटते
इंग्रजी झेलत आहोत

आई-बाबा सारखे शब्द
आमच्यादेखत हरपून गेले
ज्याला त्याला जर्सी हवीय
गावरानपण करपून गेले

पाळेमुळे तोडून स्वतःचे
उंच आम्ही बनतो आहोत
पाया गमावलेली वास्तू
विकास झाला म्हणतो आहोत

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'