Posts

संत सोयराबाई

Image
●◆तुकोबांचे शब्दधन ◆● अवघा रंग एक झाला ।  रंगी रंगला श्रीरंग ॥१॥ मी तूंपण गेलें वायां ।  पाहतां पंढरीच्या राया ॥२॥ नाही भेदाचें तें काम ।  पळोनी गेले क्रोध काम ॥३॥ देही असुनी तूं विदेही ।  सदा समाधिस्थ पाही ॥४॥ पाहते पाहणें गेलें दुरी ।  म्हणे चोख्याची महारी ॥५॥ संपूर्ण शरीर, मन, आत्मा एकाच रंगात रंगून गेले. तो म्हणजे ईश्वराचा रंग. संपूर्ण अस्तित्व विठोबा श्रीरंगाच्या भक्तिरसात पूर्णपणे ओतप्रोत झाले. "मी" आणि "तूं" असा भेदच उरला नाही. पंढरपूरच्या विठोबाला पाहताच माझं "स्वत्व" नष्ट झालं, केवळ ईश्वरच शिल्लक राहिला. भक्त आणि भगवंत यांच्यातील भेदभाव नाहीसा झाला. तसेच इतर भेदाभेद नष्ट झाले. क्रोध, वासना, वाईट विचारही निघून गेले, मन शुद्ध झालं. तूं (विठोबा) शरीरात असूनही देहाच्या पलीकडचा आहेस . सदैव समाधीस्थितीत, निर्विकार, परम शांतीत असलेला आहेस. मी पाहत असताना "मी पाहते आहे" ही जाणीवही नष्ट झाली. द्रष्टा, दर्शन आणि दृश्य एकरूप झाले, असं चोखामेळ्यांची पत्नी संत सोयराबाई म्हणतात. हा अभंग आत्मानुभवाची परमोच्च अवस्था दर्शवतो. जिथे भक्त, भगवान...

वाट ही चालावी पंढरीची

Image
टाळी वाजवावी गुढी उभारावी ।  वाट हे चालावी पंढरीची ॥१॥ पंढरीचा हाट कउलांची पेठ ।  मिळाले चतुष्ट वारकरी ॥२॥ पताकांचे भार मिळाले अपार ।  होतो जयजयकार भीमातीरी ॥३॥ हरिनाम गर्जतां भय नाहीं चिंता ।  ऐसें बोले गीता भागवत ॥४॥ खट नट यावें शुद्ध होऊनि जावें ।  दवंडी पिटी भावें चोखामेळा ॥५॥ हाताने टाळी वाजवावी, खांद्यावर ध्वज घ्यावा आणि भक्तांनी पंढरपूरच्या दिशेने निघावे. भक्तिभावाने उत्साहात टाळ वाजवत, विजयाची गुढी हाती घेऊन पंढरपूरच्या वारीच्या वाटेवर चालायला हवे.  पंढरी म्हणजे जणू एक भक्तीची पेठ आहे, जिथे भक्त (वारकरी) चारही दिशांमधून एकत्र येतात. पंढरपूर हे भक्तांचे धर्मपीठ असून, इथे चारही दिशांमधून आलेले वारकरी एकवटतात. हाती ध्वज (पताका) घेऊन हजारो वारकरी एकत्र होतात आणि भीमा नदीच्या काठी जयघोष करतात. भीमा नदीच्या किनाऱ्यावर अनंत पताका फडकत असतात आणि भक्तजनांचा जयजयकार आसमंत दुमदुमवतो. हरिनामाचा उच्चार करताना ना भय उरतं, ना चिंता. गीता आणि भागवतही हेच सांगतात. हरिनामस्मरण हेच चिंता, भय आणि दुःखाचा नाश करणारे आहे. भगवद्गीता व भागवत धर्मग्रंथ देखील हेच...

विठ्ठल माहात्म्य: संत मुक्ताबाई महाराज

Image
"मुक्त जीव सदा होति पैं नामपाठें ।  तेचि रूप विटे देखिलें आम्हीं ॥१॥ पुंडलिके विठ्ठल आणिला पंढरी।  आणूनि लवकरी तारिलें जग ॥२॥ ऐसें पुण्य केलें एका पुंडालिकेची।  निरसली जनाची भ्रमभूली ॥३॥ मुक्ताई चिंतनें मुक्त पैं जाली।  चरणीं समरसली हरिपाठे ॥४॥"  जो जीव (माणूस) भगवानाचं नामस्मरण (नामजप) सतत करतो, तो नेहमीसाठी मुक्त होतो. आम्ही देखील पंढरपूरच्या विटेवर त्या नामाच्या रूपातच विठ्ठलाचं दर्शन केलं आहे.   पुंडलिकाच्या भक्तीमुळेच विठ्ठल पंढरपूरात आले. त्यानं इतक्या सहजतेने आणि लवकर भक्तीच्या जोरावर संपूर्ण जगाला तारण्याचं काम केलं. एका पुंडलिक नावाच्या भक्तानं इतकं मोठं पुण्य केलं की, त्यामुळे सर्व सामान्य जनतेच्या मनातील अज्ञानरूपी भ्रम नाहीसे झाले (निरसले). संत मुक्ताबाई महाराज म्हणतात, "मी भगवंताचं चिंतन केलं आणि मी स्वतः मुक्त झाले. मी भगवंताच्या चरणांमध्ये हरिपाठ करत करत पूर्णपणे एकरूप झाले." नामस्मरण, भक्ती, आणि पंढरीतील संतांची साधना याचा महिमा वर्णन केला आहे. नामस्मरणामुळे जीव मुक्त होतो. पुंडलिकाच्या भक्तीनं विठ्ठल पृथ्वीवर आला. न...

लोकराज राजर्षी छत्रपती शाहू महाराज – समतेचे शिल्पकार

Image
◆●लोकराज राजर्षी छत्रपती शाहू महाराज – समतेचे शिल्पकार●◆ ◆श्रीकृष्ण महाराज उबाळे ◆मो.9405344642 भारतीय इतिहासातील जे थोडे फार राजे केवळ राजसत्तेपुरते मर्यादित न राहता समाज परिवर्तनाचे कार्य करू शकले, त्यात सर्वप्रमुख नाव म्हणजे छत्रपती शाहू महाराज. त्यांचे कार्य, विचार आणि निर्णय केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित नव्हते, तर ते आजच्या लोकशाही व्यवस्थेच्या गाभ्याशी सुसंगत आहेत. म्हणूनच त्यांना “राजर्षी”, “लोकराज” ही बिरुदं मिळाली, आणि ती त्यांनी त्यांच्या कार्याने सार्थही केली. १. सामाजिक समतेसाठी झगडणारा राजा : शाहू महाराजांचा कार्यकाळ म्हणजे समाजात खोलवर रुजलेल्या जातिभेद आणि विषमतेविरुद्धचा संघर्ष. त्यांना कळून चुकले होते की देशातील बहुसंख्य लोक वंचित, शोषित आणि दलित आहेत, आणि जोपर्यंत या घटकांना समान अधिकार, शिक्षण आणि संधी मिळत नाही, तोपर्यंत खरी प्रगती शक्य नाही. त्यांनी वंचित समाजासाठी शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक सुधारणा राबवून त्या वर्गांना नवजीवन दिलं. मंदिर प्रवेश, विहिरींचा वापर, शाळांमध्ये प्रवेश, सार्वजनिक ठिकाणी समान वागणूक यासाठी त्यांनी अनेक कठोर आणि क्रांतिकारक...

संत जनाबाई वारी अभंग

Image
"कीर्तनाचा रस आवडे नरासी ।  लागती पायांसी मुक्ति चार्‍ही ॥१॥ वारी पंढरीचा निश्चयें म्यां केला ।  वारकरी झाला पंढरीचा ॥२॥ मोक्षाचा जो मोक्ष मुक्तीची जे मुक्ती ।  जनी म्हणे किती सांगुं फार ॥३॥" माणसाला कीर्तनाचा (भगवंताच्या नामस्मरणाचा, भजनाचा, प्रवचनाचा) रस आवडू लागतो, तेव्हा त्याच्या चरणी (पायाशी) चारही मुक्ती (सालोक्य, सामीप्य, सारुप्य, सायुज्य) आपोआप येऊन उभ्या राहतात. भक्तीच्या मार्गानेच मुक्ती मिळते, असा हा भाव आहे. मी पंढरपूरच्या वारीचा ठाम निश्चय केला आहे. त्यामुळे मी आता खरा पंढरीचा वारकरी झालो आहे. (वारी म्हणजे केवळ चालण्याचे कष्ट नव्हे तर अंतःकरणाने विठोबाला समर्पण.) संत जनाबाई महाराज म्हणतात, "मोक्षामध्ये जो खरा मोक्ष आहे, मुक्तीत ज्या मुक्तीचा सार आहे तो वारीत आहे. हा अनुभव मी मिळवला आहे. मी हे किती सांगू, शब्द अपुरे पडतात. हा माझा  अनुभव खूप गूढ आणि व्यक्तिगत आहे." जय जगद्गुरू....! जय विठ्ठल....! ◆श्रीकृष्ण महाराज उबाळे ◆मो.9405344642 #वारीचीभावना #कीर्तनसेमुक्ती #वारकरीसंप्रदाय #पंढरीचीओढ #हरिपाठाचीगोडी #विठूमाउली #भक्तीरस #नामस्मरण #मुक्तीच...

संत नामदेव महाराज अभंग

Image
भेटिलागीं माझा फुटतसे प्राण । काया वाचा मनें जीवेंभावें ॥१॥ जया देखे तया पुसें हेंचि मात । कैं मज अनंत बोलावील ॥२॥ संतसमागमें दसरा दिवाळी । ठेवूनि निढळीं बाहे सदा ॥३॥ सखे पंढरीचे येती वारकरी । आर्त निरंतरीं त्यांचे पायीं ॥४॥ नामा म्हणे ऐसें करी दंडवत । आमुतें पुनीत करी बापा ॥५॥ भगवंताची भेट घडावी म्हणून माझा जीव तळमळतो आहे. शरीर, वाणी, मन, प्राण आणि भावनांनाही भगवंताच्या भेटीची आस लागली आहे. प्रत्येक अंगामधून, विचारांमधून, भावनांमधून एकच आर्त ध्वनी उमटतो — "मला माझा पांडुरंग भेटावा...!'' ही उत्कंठा इतकी तीव्र आहे की, भक्ताचं अस्तित्वच केवळ भगवंताच्या भेटीसाठी झुरतं आहे. जे कोणी भेटेल, त्याला मी हेच विचारतो- "अनंत (भगवंत) मला कधी भेटणार? तो मला कधी बोलावणार?" संत नामदेव महाराजांचा जीवच इतका अनावर झाला आहे की, प्रत्येक माणसाकडे त्यांना एकच प्रश्न पडतो-"माझ्या पांडुरंगाची भेट कधी होईल ?" ही भावना भक्ताच्या अंतर्मनातील अखंड, अधीर प्रश्न आहे. संतांचा संग म्हणजे माझ्यासाठी दसरा आणि दिवाळी..! भक्त असे म्हणतो की, सणवार नसले तरी संतांचा संग मला सदैव ...

फक्त करिअर नाही, माणूस घडवा...मुलांना जगुद्या......!!

Image
"फक्त करिअर नाही, माणूस घडवा...मुलांना जगुद्या......!!" ◆श्रीकृष्ण उबाळे, बीड ◆मो.9405344642 आजच्या शिक्षणाच्या स्पर्धेत आपण एक महत्त्वाचा मुद्दा विसरतोय — आपलं मूल माणूस आहे, मशीन नाही! आज IIT, NEET यांसारख्या स्पर्धा परीक्षांनी कित्येक मुलांचे भवितव्य सरळ न करताच, वाकडं केलं आहे. परीक्षा फक्त ज्ञानाची कसोटी नसून, ती अनेकदा मुलांच्या मानसिक आरोग्याचीही परीक्षा ठरते. पालक, शिक्षक आणि समाज यांचं एकच स्वप्न — "माझं मूल इंजिनिअर किंवा डॉक्टर व्हावं." पण का? मुलांची खरी क्षमता, त्यांची आवड, त्यांचं वेगळेपण का स्वीकारत नाही आपण? फक्त दोनच क्षेत्रं भवितव्य घडवतात का? साधना भोसले. डॉक्टर होण्यासाठी धडपडत होती. पण तिला हे क्षेत्र झेपलं नाही. तिच्यावर लादलेलं स्वप्न तिच्या वडिलांनी लाकडाच्या दंड्याने मोडून टाकलं — तिला मारूनच टाकलं. का? कारण तिला 'डॉक्टर' होणं जमलं नाही. पण ती जर डॉक्टर झाली नसती, तरी ती 'काहीतरी' झाली असती — एक चांगली शिक्षक, लेखिका, कलाकार, शास्त्रज्ञ किंवा समाजसेविका किंवा चांगली गृहिणी झाली असतीच ना...! तिच्या अस्तित्वालाच आपण...