अफवा

वात्रटिका

अफवा

एका त्या संशयाने
माणुसकीची काशी रे
चोर जातात पळून
संन्याशाला फाशी रे

अफवा म्हणजे संशयाचे
भलंमोठं नाव
नावानं या गरिबांवर
किती घातले घाव

अफवेला देशामध्ये
नको थोडाही थारा
अफवा म्हणजे काय
अंधळेपणाचा वारा...!!

श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी