मोके पे चौका

वात्रटिका

मोके पे चौका

जगासाठी कोरोना
अस्तित्वाला धोका
संधीसाधू नजरांना
दिसतो मोठा मोका

भीतीचे मार्केटिंग
हा उघड धंदा आहे
योगायोग नाही राव
यातच खरा चंदा आहे

खरे खोटे जाणायला
आम्ही खरंच भोळे
टपलेल्या बगळ्यांचे
कधी ओळखणार चाळे ?

-श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'