वात्रटिका पर्याय उंदरांचा त्रास होता म्हणे केलं आता खुश पर्याय म्हणून त्याला सोडली मोठी घुस घुस किती लाभाची वाजतगाजत वरात अपेक्षांच्या पावसाची मुसळधार खैरात...! -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.9405344642
वात्रटिका ठिगळं गुत्तेदाराने मॅनेज करून कामच केलं सगळं एका वर्षाच्या आतमध्ये रस्त्याला पडली ठिगळं प्रश्न काही विचारायला कोणी जीभ नाही हालवली वर्षानुवर्षे डांबरखाऊंनी वार्षिक योजना चालवली....! -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.९४०५३४४६४२
वात्रटिका #सत्तेतील दानव सत्तेवाले शेतकऱ्यांची सांगू लागले कहाणी कोणी म्हणे खलिस्तानी कोणी चिनी पाकिस्तानी निरंकुश सत्तेचा जागा झाला दानव मग सांगा कशी येईल बापाची आपल्या कणव ? कोणतीही सत्ता असो नियत नसते साफ बापही सत्तेपोटी वाटतो त्यांना साप....! -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.9405344642
वात्रटिका डिग्रीवर शंका बाद झालेल्या मतांचा राज्यात झाला विक्रम पदवीधर म्हणता म्हणता म्हणा आम्हाला चक्रम शिकलेले असल्याचा कशाला वाजवा डंका ? बायकोच आता डिग्रीवर घेऊ लागलीय शंका....! -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.९४०५३४४६४२
वात्रटिका #तीनचाकी रिक्षा बुलेट ट्रेनला टाटा तीनचाकी रिक्षाची आवड विधान परिषदेची यावेळी अशीच काहीशी निवड एककल्ली तुणतुण्याचा ज्यांना ज्यांना नाद आहे सुशिक्षित लोकांकडून त्यांना हवाई प्रसाद आहे -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.९४०५३४४६४२