सत्तेतील दानव
वात्रटिका
#सत्तेतील दानव
सत्तेवाले शेतकऱ्यांची
सांगू लागले कहाणी
कोणी म्हणे खलिस्तानी
कोणी चिनी पाकिस्तानी
निरंकुश सत्तेचा
जागा झाला दानव
मग सांगा कशी येईल
बापाची आपल्या कणव ?
कोणतीही सत्ता असो
नियत नसते साफ
बापही सत्तेपोटी
वाटतो त्यांना साप....!
-श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
Comments
Post a Comment