पंढऱ्यांचे काळे धंदे

वात्रटिका

पंढऱ्यांचे काळे धंदे

एकाचे नंतर दुसऱ्याचे
वाजू लागले डफडे
पांढऱ्या कपड्यावाल्यांचे
नागडे झाले लफडे

आजच्या मस्तवालांची
वागणूक म्हणे चांगली
अनैतिकतेला समर्थन
भक्तांनी लाज टांगली

ज्यांना कठोर शिक्षा व्हावी
ते सत्तेमध्ये लोळत आहेत
बंदिस्त आंधळे कायदे
चुपचाप हात चोळत आहेत....!

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी