वात्रटिका कोरोनावर उपाय वाटत असेल देशातून संपूर्ण कोरोना जावा एकच उपाय करा लगेच निवडणुका लावा निवडणुका आहेत तिथे कोरोनाची बत्ती गुल्ल निवडणुका नाहीत तिथे दवाखाने हाऊस फुल्ल -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.९४०५३४४६४२
वात्रटिका लुटीचा राजमार्ग संकटाला संधी बनवून माणूस माणसाला लुटतोय मोहाच्या लांब जिभेने माणसाचंच रक्त चाटतोय इंजेक्शनच शॉर्टेज लुटीचा राजमार्ग नरकातील किड्यांना काय सांगावा स्वर्ग ? -श्रीकृष्ण उबाळे, बीड मो.९४०५३४४६४२
वात्रटिका कावळ्यांचा शाप मेंदूतील प्रदर्शनाशिवाय काहींचे पोट भरत नाही कावळ्यांच्या शापाने गाय कधीच मरत नाही या अशा अभिव्यक्तीला सांस्कृतिक वारसा आहे स्वतःच स्वतःला विचारा तुमचं मन आरसा आहे -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.९४०५३४४६४२
वात्रटिका राष्ट्रीय पक्षी पोपट इतिहासाची पुन्हापुन्हा चिवडून चिवडून भेळ राष्ट्रीय पक्षी बदलण्याची आली म्हणा की वेळ मोर चांगला असला तरी पोपटाएवढा बोलका नाही नटून थटून उठावदार दिसायलाही शेलका नाही -श्रीकृष्ण उबाळे, बीड मो.९४०५३४४६४२
वात्रटिका मन 'मन की बात' जसजशी वाढू लागली पांढऱ्या दाढीची साईज तसतशी वाढू लागली पेट्रोल,डिझेल,गॅसची प्राईज कोरोनाने कोलमडले महागाईत लागले रांगायला भक्तांना बोलताही येईना मनाशीच लागले सांगायला हिच आहे खरीखुरी मन 'मन की बात' अवघड जागेचं दुखणं बसा दात ओठ खात -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.९४०५३४४६४२
वात्रटिका शंभरी 'खाऊंगा ना खाने दूंगा' मन की बात खरी केली पेट्रोलच्या महागाईने कधीच पार शंभरी केली एवढा कहार करूनसुद्धा मागचाच पाढा वाचू लागले अन्याय कितीबी झाला तरी समर्थनात भक्त नाचू लागले...! -श्रीकृष्ण उबाळे, बीड मो.९४०५३४४६४२
वात्रटिका पंढऱ्यांचे काळे धंदे एकाचे नंतर दुसऱ्याचे वाजू लागले डफडे पांढऱ्या कपड्यावाल्यांचे नागडे झाले लफडे आजच्या मस्तवालांची वागणूक म्हणे चांगली अनैतिकतेला समर्थन भक्तांनी लाज टांगली ज्यांना कठोर शिक्षा व्हावी ते सत्तेमध्ये लोळत आहेत बंदिस्त आंधळे कायदे चुपचाप हात चोळत आहेत....! -श्रीकृष्ण उबाळे, बीड मो.९४०५३४४६४२
वात्रटिका आंदोलनजीवी आंदोलन करणारे बनले आंदोलनजीवी प्रधान सेवकांनीच जोडली नवी ओवी आमच्या लोकांना आम्ही मनातून झोडत आहोत ज्या फांदीवर बसलोत तीच फांदी तोडत आहोत -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.९४०५३४४६४२
वात्रटिका फुल आणि काटे दिसत असूनही साहेब डोळे उगाच झाकू नका फुल नाही लावू शकत काटे तरी टाकू नका अहंकाराचे गवत जमवून मोठेपणा करू नका लहान जरी असली आगीशी वैर धरू नका -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.९४०५३४४६४२