बलिदानाचा अर्थ

◆बलिदानाचा अर्थ◆


रोज नव्या भोंदू बुवाचा
चमत्कार इथे घडतोय
साऱ्या व्यवस्थेचा मेंदू
यामुळेच तर सडतोय
कधी येईल विवेकाला जाग ?
हा प्रश्न मनाला छळतोय
डॉक्टर तुमच्या बलिदानाचा
अर्थ कुणाला कळतोय ?

ज्यांनी धर्म शिकवायचा
त्यांची आज शरम वाटते
ज्यांच्यामुळे शांती यावी
त्यांची मनात भीती दाटते
त्यागाचा मुकुटमणी व्हावा
तो नको तिथे लोळतोय
डॉक्टर तुमच्या बलिदानाचा
अर्थ कुणाला कळतोय ?

सत्य असत्य पाहण्याची
कुठे भक्तांना शुद्ध असते ?
आमच्याच बांधवांशी
आमचे खुले युद्ध असते
सारा देश अभक्तांनी
इथून तिथून जळतोय
डॉक्टर तुमच्या बलिदानाचा
अर्थ कुणाला कळतोय ?

तुकारामांच्या भाषेत बुडणारे
डोळ्यांनी पाहवत नाही
उगाच शांत बसावे
हे मनाला राहवत नाही
तुमच्या मार्गाने जाणाऱ्यांना
इथला अधर्म गिळतोय
डॉक्टर तुमच्या बलिदानाचा
अर्थ कुणाला कळतोय ?

लोकांना विचाराने येणार नाही
निदान दुष्कृत्यांने जाग येईल
आपण किती भाबडे आहोत
याचाही कधी राग येईल
नाहीतर कुत्रं पीठ खातंय
आंधळा आपला दळतोय
डॉक्टर तुमच्या बलिदानाचा
अर्थ कुणाला कळतोय ?

◆श्रीकृष्ण उबाळे,बीड
◆मो.9405344642

#बलिदानाचा_अर्थ #नरेंद्रदाभोळकर #अंधश्रद्धा_निर्मूलन #विवेकाची_जाग #भोंदूबुवा #सामाजिकजागृती #विचारक्रांती #सत्यआणिअसत्य #मानवता #प्रबोधन #समाजपरिवर्तन #विवेकवाद #अंधश्रद्धेविरोधात #तर्कशुद्धविचार #समाजजागृती #डॉदाभोळकर #बलिदान #न्यायआणिसत्य #धर्मआणिविवेक #जागरूकनागरिक

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'