Posts

राष्ट्रीय पक्षी पोपट

Image
वात्रटिका राष्ट्रीय पक्षी पोपट इतिहासाची पुन्हापुन्हा चिवडून चिवडून भेळ  राष्ट्रीय पक्षी बदलण्याची आली म्हणा की वेळ मोर चांगला असला तरी पोपटाएवढा बोलका नाही नटून थटून उठावदार दिसायलाही शेलका नाही -श्रीकृष्ण उबाळे, बीड मो.९४०५३४४६४२

मन 'मन की बात'

Image
वात्रटिका मन 'मन की बात' जसजशी वाढू लागली पांढऱ्या दाढीची साईज तसतशी वाढू लागली पेट्रोल,डिझेल,गॅसची प्राईज कोरोनाने कोलमडले महागाईत लागले रांगायला भक्तांना बोलताही येईना मनाशीच लागले सांगायला हिच आहे खरीखुरी मन 'मन की बात' अवघड जागेचं दुखणं बसा दात ओठ खात -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.९४०५३४४६४२

पेट्रोल शंभरी

Image
वात्रटिका शंभरी 'खाऊंगा ना खाने दूंगा' मन की बात खरी केली पेट्रोलच्या महागाईने कधीच पार शंभरी केली एवढा कहार करूनसुद्धा मागचाच पाढा वाचू लागले अन्याय कितीबी झाला तरी समर्थनात भक्त नाचू लागले...! -श्रीकृष्ण उबाळे, बीड मो.९४०५३४४६४२

पंढऱ्यांचे काळे धंदे

Image
वात्रटिका पंढऱ्यांचे काळे धंदे एकाचे नंतर दुसऱ्याचे वाजू लागले डफडे पांढऱ्या कपड्यावाल्यांचे नागडे झाले लफडे आजच्या मस्तवालांची वागणूक म्हणे चांगली अनैतिकतेला समर्थन भक्तांनी लाज टांगली ज्यांना कठोर शिक्षा व्हावी ते सत्तेमध्ये लोळत आहेत बंदिस्त आंधळे कायदे चुपचाप हात चोळत आहेत....! -श्रीकृष्ण उबाळे, बीड मो.९४०५३४४६४२

आंदोलनजीवी

Image
वात्रटिका आंदोलनजीवी आंदोलन करणारे  बनले आंदोलनजीवी प्रधान सेवकांनीच  जोडली नवी ओवी  आमच्या लोकांना आम्ही मनातून झोडत आहोत ज्या फांदीवर बसलोत तीच फांदी तोडत आहोत -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.९४०५३४४६४२

फुल आणि काटे

Image
वात्रटिका फुल आणि काटे दिसत असूनही साहेब डोळे उगाच झाकू नका फुल नाही लावू शकत काटे तरी टाकू नका अहंकाराचे गवत जमवून मोठेपणा करू नका लहान जरी असली आगीशी वैर धरू नका -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.९४०५३४४६४२

संधीची असमानता

Image
वात्रटिका संधीची असमानता संधीची समानता संविधानाचा आत्मा आत्म्याचा राज्यात दिवसाढवळ्या खात्मा समतेच्या गप्पा बोलायच्या असतात व्यवहारात मात्र कोलायच्या असतात...! -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.9405344642