मुंगळ्यांची झेप

वात्रटिका

मुंगळ्यांची झेप

समोर दिसली
गुळाची ढेप
मुंगळे मारतात
तिच्याकडे झेप

गुळाची चव
भलतीच गोड
तिचीच साऱ्यांना
खरीखुरी ओढ

गुळाशिवाय त्यांना
करमत नाही
कुठंही घुसायला
ते शरमत नाही

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी