लोकशाहीची धून

वात्रटिका

लोकशाहीची धून

बाप आहे लेक आहे
नातू आहे सून आहे
लोकशाहीच्या जत्रेमध्ये
घराणेशाहीची धून आहे

भाऊ आहे बहिण आहे
सारे सारे घरात आहे
सर्वपक्षीय कट्टर भक्तांनो
तुमची फुकट वरात आहे

पदाच्या पुढे इथल्या
घराण्यांना लाज नाही
मतदारही असे वागतात
जणू त्यांना विलाज नाही

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'