उणेउणे

वात्रटिका

उणेउणे
-----------
आजी गेले माजी गेले
गेले सगळे राजे
गड ढासळले किल्ले पडले
खिळखिळे मुख्य दरवाजे

सत्तेच्या झाडाखालची
सावली सर्वांना हवी असते
वाळलेले झाड सोडण्याची
पक्षांची रीत नवी नसते

वाळलेले जुने झाड
सध्या सुनेसुने आहे
अधिकतेचे माहित नाही
सरीकडे उणेउणे आहे...!!

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी