कोरोना व्हायरस

वात्रटिका

कोरोना व्हायरस

निसर्गाचा मानवाने
केला पाणउतारा
निसर्गही मानवावर
फिरवतोय पोतारा

निसर्गाला मानवाकडून
जेंव्हा जेंव्हा तडा आहे
व्हायरसच्या रूपाने
शिकवलेला धडा आहे

कर्माची फळं द्यायला
त्याच्या हाती फलक आहे
आता तरी सुधरा रे
कोरोना एक झलक आहे

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी