राजकीय संस्कृती
वात्रटिका
राजकीय संस्कृती
राजनेता कल्याण करील
ही भोळीभाबडी आशा
नेत्यांच्या तोंडी मात्र
दगड तलवारीची भाषा
सोयीनुसार रंग बदलणे
ही राजकारणाची शान
कुणीच दिलं नसतानाही
देऊ लागले आव्हान
तलवारीची भाषावाले
लढताना घरात असतात
जखमा आणि घाव
जनतेच्या उरात असतात
-श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.९४०५३४४६४२
Comments
Post a Comment