'शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे की' तुकोबांचा संपूर्ण अभंग


शिव तुझे नाव ठेविले पवित्र |
छत्रपती सूत्र विश्वाचे की ||१||

ऐसा हा करावा नित्य व्यवहार |
दुष्टांचा संहार धर्मनित ||२||

स्त्री कुणबियांचे करावे पालन |
आणिक निर्दालन ठकाठकी ||३||

भेदाभेद भ्रम सारावा विचार |
निश्चयाचे सार बाणावे ते ||४||

तुका म्हणे ऐसे जाणावे हे वर्म
रक्षावया धर्म सत्य जगी ||५||

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'