अर्थव्यवस्थेचा कणा

वात्रटिका

अर्थव्यवस्थेचा कणा

दारू महाग झाली म्हणूून
त्याचा कधी मोर्चा नाही
राजकारण्यांची आस्थेने
त्यावर साधी चर्चा नाही

रांगेत उभे राहायला
कधी तो दमत नाही
त्याच्याशिवाय सरकारला
काम करणं जमत नाही

बेवडा, पेताड, दारुडा
असं तुम्ही काहीही म्हणा
तो मात्र खरा देशीभक्त
अर्थव्यवस्थेचा कणा...!

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी