'बारा'चे


'बारा'चे
साहित्याच्या बोकांडी 'राव'
कलेच्या बोकांडी 'बला'
परिषदेत जमण्यासाठी
बगळ्यांचीच मलमला
हवे तेच करतात
एवढी लोकशाही वाकली
सत्तर वर्षाची म्हातारी
खरंच आता थकली
ज्यांच्या हाती सत्ता
त्यांच्या पक्षाच्या थराचे
राज्यपाल नियुक्त
असे असतात 'बारा'चे
-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी