भारतमाता
बीडचे नवोदित वत्रटिकाकार
👉🏻श्रीकृष्ण उबाळे👈🏻 यांची जयजयकाराच्या वादावरील कविता....
✍🏻 मी भारत माता की जय म्हणनार आहे ✍🏻
कोणाच्या दबावाने नाही
कोणाच्या नाहीच्या आभावाने नाही
कोणाच्या मुंडके कापण्याच्या प्रभावाने नाही
उलट मी आशांच्या थोबाडात हाणणार आहे....
होय..मी भारत माता की जय म्हणणार आहे ! ||1||
मी हिन्दू नाही
मी मुसलमान नाही
मी बौद्ध ,जैन,सिख,ख्रीच्चन कोणीही नाही
मी एक भारतीय आहे
एवढेच फक्त जाणणार आहे...
होय..मी भारत माता की जय म्हणणार आहे ! ||2||
भारतमाता म्हणजे नाही मूर्ती
भारतमाता आहे माझी धरती
जिच मी अन्न खतो
हितच मी मरुन जातो
तिच्यावर माथा टेकवतो
मी देशाचं ऋण जाणणार आहे
होय..मी भारत माता की जय म्हणणार आहे ! ||3||
तिरंग्यासाठी जे घडलेच नाहीत
देशासाठी कधी लढ़लेच नाहीत
फक्त आदेश देणारे
कधीच कुठे न मरणारे
यांचा हेतु मी जानणार आहे
होय..मी भारत माता की जय म्हणणार आहे ! ||4||
मी राजकारण ओळखणार आहे
मी केंद्रीकरण ओळखणार आहे
माझा देश आहे हा
मी त्याचा आनंदाने जयघोष करणार आहे
मी म्हणत होतो
मी म्हणत आहे
होय..मी भारत माता की जय म्हणणार आहे !
होय..मी भारत माता की जय म्हणणार आहे !!! ||5||
✊भारत माता की जय ✊
✍🏻श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.9405344642
कृपया मोडतोड न करता जसी आहे तसी.......ही कविता संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचली पाहिजे.
Comments
Post a Comment