पाणी एक्सप्रेस
बीडचे नवोदित वत्रटिकाकार
👉🏻श्रीकृष्ण उबाळे👈🏻 यांची लातुरच्या "पाणी एक्सप्रेस" वरील कविता
💧💧पाणी एक्सप्रेस 💧💧
पाणी नाही प्यायला
न्हायला की धोयला
कोरडी विहिर दंग झाली
सगळी रेल्वे तंग झाली
आली आली आली
पाणी एक्सप्रेस ! ||1||
पाण्यावर चर्चा
पाण्यावर खर्चा
पाण्याच्या विरोधात मोर्चा
वेळ कशी आली
पाहा वेळ कशी आली
आली आली आली
पाणी एक्सप्रेस ! ||2||
राम विहिरीत पडुन मेला
रहीम टैंकर खाली गेला
पाण्यासाठी लाठी काठी
माय बहिन खेळत्यात
आज शिमगा पाण्यासाठी
वेळ कशी आली
पाहा वेळ कशी आली
आली आली आली
पाणी एक्सप्रेस ! ||3||
शळेला दिला लवकरच टर्न
पाण्यामुळे घडला असा लातूर पॅटर्न
हंडयासाठी वनवन
हिंडतेत भनभन
बैनर ने लातूर नगरी सज्ज झाली
आली आली आली
पाणी एक्सप्रेस ! ||4||
उतु नका मातु नका
जपा जरा आता
भांडु नका सांडु नका
गिरवु नका कित्ता
रेल्वे सज्ज झाली
पहा रातितच आली
आली आली आली
पाणी एक्सप्रेस ! ||5||
भविष्यात पुढे
थेंब थेंब अडवा
झाडे लावा झाडे जगवा
मंत्र हाच गिरवा
नाहितर पुन्हा
आली आली आली
पाणी एक्सप्रेस !
आली आली आली
पाणी एक्सप्रेस ! ||6||
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
aajchitika.blogspot.in
कृपया कविता आवडल्यास मोडतोड़ न करता जसी आहे तसी नक्की शेयर करावी🙏🙏🙏
Comments
Post a Comment