फक्त तुमचाच जय हो

नवोदित वत्रटिकाकार
👉🏿श्रीकृष्ण उबाळे👈🏿 यांची
एक कविता🌺🌺🌺🌺🌺

✊फक्त तुमचाच जय हो✊

गल्लीपासून दिल्लीपर्यन्त
सगळच हातात आलय
राज्याराज्यात जिल्ह्याजिल्ह्यात
मेळाव्याचं नियोजन केलय
शिवरायांना विकृत करीत
पार देवबप्पाच केलय
म्हणून भारत मातेचा नाही
फक्त तुमचाच जय हो ! ||1||

हैद्राबादचं साम्राज्य
औरंगाबाद मुंबई पर्यंत आलय
बिहारमध्ये जमलं नाही
यूपीत आता ठरलय
द्वेष पेरून तुम्हिपण
छान काम केलय
म्हणून हिन्दुस्तानचा नाही
फक्त तुमचाच जय हो ! ||2||

योगाचं राज्य तुमचं
साऱ्या जगभर आलय
विदेशी सारं बंद
पतंजली सारं झालय
तुमचं बी बाबापण
माना कापन्या पर्यन्त गेलय
म्हणून स्वाभिमानी भारताचा नाही
फक्त तुमचाच जय हो ! ||3||

शानित राज्य आलय
महालक्ष्मीची बारी आहे
प्रसिद्ध होण्याची तुमची
खरच आयडिया भारी आहे
मिडिया तुमच्यासाठी
झाली जयजयकारी आहे
हवेनेच तुमची आता
प्रत्येक मंदिरात वारी आहे
म्हणून कायद्याचा नाही
फक्त तुमचाच जय हो! ||4||

खोट्यांचा जय हो
खऱ्यांचा जय हो
साऱ्यांचा जय हो ||5||

आता भावनेच्या धंद्यात पडू नका
झोडायच्या म्हणून गप्पा झोडु नका
नसता जनताच तुम्हाला खोडून टाकिल
जनताच तुम्हाला फाडून टाकिल ! ||6||

✍🏻कवी : श्रीकृष्ण उबाळे,बीड
        मो.9405344642.
aajchitika. blogspot. in
Facebook page:आजची टिका

कविता आवडल्यास मोडतोड न करता जसी आहे तसी नक्की शेयर करा🙏🏻🙏🏻🙏🏻

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'