कृतघ्नता

वात्रटिका

कृतघ्नता

राष्ट्रभक्त असणं
कुणाची मक्तेदारी नाही
शहीद कोण ठरवणे
कुणाची गुत्तेदारी नाही

आजकाल मक्तेदारीचं
काहींच्या मनात खूळ आहे
देशद्रोह्यांचं उदात्तीकरण
ही गुत्तेदारांची चुळबूळ आहे

शहिदांना शिव्या देणाऱ्यांनो
माणुसकीवर विघ्न होऊ नका
खरे भारतीय असाल तर
एवढे कृतघ्न होऊ नका

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी