शाही लोकांचा फंडा



वात्रटिका

शाही लोकांचा फंडा

आईला पद बापाला पद   

पोराचा दुरंगी झेंडा

खैरात सारी यावी घरात

शाही लोकांचा फंडा

पदासाठी रंग बदलला

सरड्या इथे लाजला रे

माकडउड्यांचा नगरी पॅटर्न

देशात साऱ्या गाजला रे

पार्टी विथ डिफरन्स

तोंडाने फक्त बोंबला रे

लोकशाहीचा फाटका पदर

वेशीवरच लोंबला रे

-श्रीकृष्ण उबाळे, बीड

मो.९४०५३४४६४२


Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी